पुणे |
दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली.
दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा राहुलची होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर ‘मला वेळ द्या ‘अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला
राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर जखमा आढळल्यानं तिचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.
दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.
राहुल हांडोरे नेमका कुठं होता?
वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता बागवे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या वृत्तानुसार गायब असलेल्या राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रज होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता.
पुण्यातून गायब झाल्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याच्या एटीएम कार्डवरुन पैसे काढण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यानं त्याच्या एका नातेवाईकाशी फोनवरुन संवाद साधला होता. एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडलं असल्याचं तो म्हणाले. त्यानंतर कसलिही माहिती न दे त्यानं फोन बंद केला होता. त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.