Home ताज्या बातम्या निवडणूक आचारसंहिता; परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश

निवडणूक आचारसंहिता; परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश

0

बीड |

भारत निवडणूक आयोग यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम दिनांक 15आक्टोबर 2024 रोजी घोषीत केलेला आहे. त्याबाबतची आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी पासून लागू झालेली असून सदर निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

आदर्श आचार संहीतेमध्ये शस्त्र परवानाधारक यांचे परवान्यावरील मंजुर शस्त्र अनामत करणे बाबत निर्देश असून या निर्देशामध्ये निवडणूका जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले असून त्यानुसार स्क्रिनिग समितीच्या बैठकीत शस्त्र परवानाधारक यांचे शस्त्र अनामत करणे बाबत छाननी करण्यात आली आहे.

          बीड जिल्हयाची विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024, शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्हयातील शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे (बँका,महत्वाची कार्यालये,संस्था,विद्युत केंद्र व इतर महत्वाची कार्यालये यांच्याकडील शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून) इतर शस्त्ररधारकांनी शस्त्रे जमा करणे आवश्यक असल्याने सदरची शस्त्रे आचारसंहिता कालावधीसाठी जमा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version