Home ताज्या बातम्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 7 दिवस असणार ड्राय डे!

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 7 दिवस असणार ड्राय डे!

0

 

यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नोव्हेंबर महिन्यामधले महाराष्ट्रातले ड्राय डे ही वाढले आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या ड्राय डेचे 7 दिवस झाले आहेत.

 

महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त तर 15 नोव्हेंबरल गुरू नानक जयंती निमित्त ड्राय डे आहे. तर 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील, तेव्हापासून ते 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेपर्यंत राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल असल्यामुळे त्यादिवशीही ड्राय डे असेल.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.

 

ड्राय डे का?

 

राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी मतदारांना लाच देण्यासाठी दारूचा वापर करू नये, यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 2 दिवस आधी ड्राय डे घोषित करण्याचा नियम केला आहे. या नियमानुसार मतदारांना आमिष म्हणून दारू सेवन आणि वितरण रोखण्यासाठी दारूची दुकानं बंद ठेवली जातात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version