Home ताज्या बातम्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी...

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी निकाल

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक आहे, होणार आहे. मतदान 20 निवडणुकीचा निकाल 23नोव्हेंबर रोजी लागणार आहे. राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार, यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक निकालांची माहिती आहे.

 

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली तरी मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य पक्ष हे काही मतदारसंघातील मतांचे गणित बिघडवू शकतात.

 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी इंडिया आघाडीला 31 तर एनडीएला 17 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली. भाजपने 23 जागा गमावल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागा मिळाल्या होत्या.

 

महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीला चांगली टक्कर दिली होती. आता विधानसभेतही हा इम्पॅक्ट पाहायला मिळणार की लाडकी बहीण योजना वरचढ ठरणार याची उत्सुकता आहे. विकास कामांचा धडाका की विरोधकांचे खडेबोल जनता कुणाला कौल देणार याचा फैसला मतदारराजा घेणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version