Home अंबाजोगाई अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

0

अंबाजोगाई-लातूर रोडवर भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत. मुसळधार पावसात अंदाज न आल्याने कार- आणि कंटेनरची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चुराडा झाला असून कारमधील सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या अंबाजोगाई -लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

 

रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एएस 6334) औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. हा अपघात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

 

सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version