Home परळी दिल्ली माझ्यासाठी खूप लांब; लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले

दिल्ली माझ्यासाठी खूप लांब; लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितले

0

बीड |

परळीत बॅनर झळकल्‍यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा रंगत होती. मात्र धनंजय मुंडे यांनी याबाबत स्पष्टच सांगितले असून माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे. मी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्‍याचे सांगितले.

परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते. मात्र आज बीड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास मुंडे यांनी बोलून दाखविला आहे.

मी अजून खूप लहान

धनंजय मुंडे यांनी सांगितले, की लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीन खूप लहान आहे. असे सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version