Home बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी  अतिवृष्टी व  गारपीट नुकसानग्रस्त झालेल्या  पिकांची केली...

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी  अतिवृष्टी व  गारपीट नुकसानग्रस्त झालेल्या  पिकांची केली पहाणी 

0
 बीड |
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज परळी वै तालुक्यातील मौ सेलू (स), पिंपळगाव (गाढे) शिवारातील काल झालेल्या गारपीट नुकसान ग्रस्त पिकांची पहाणी केली.    ज्वारी,कांदा,मिर्ची,काकडी,व ईतर फळपिके व भाजीपाला या पिकांची पहाणी केली.
 यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका कृषी अधिकारी श्री सोनवणे ,नायब तहसीलदार बी. एल रुपनर , सरपंच सेलू( स ) नवनाथ गर्जे , तसेच मंडळ अधिकारी,  तलाठी  व  शेतकरी हजर होते.
याप्रसंगी त्यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.  प्रशासन अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करत असल्याचा दिलासा दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version