-2.3 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

आता शेतकरी पडीक जमिनीतूनही कमाई करु शकतात; काय आहे प्रधानमंत्री कुसुम योजना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कसदार जमिनीतून शेतकरी पिकं घेऊन कमाई करतात. मात्र आता शेतकरी पडीक जमिनीतूनही कमाई करु शकतात. ती कमाई कशी करता येते याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्याची सुविधा देते. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली आणि नंतर ती आणखी वाढवण्यात आली. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना 25 वर्षे विना टेन्शन नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकरी सब्सिडीवर त्यांच्या शेतात किंवा पडीक जमिनीवर सोलर पंप बसवू शकतात. पीएम कुसुम योजनेअंतर्गत, शेतकरी सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगली पिकंही घेऊ शकतात.

ही आहे अट

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सब्सिडीवर सोल पॅनल मिळतात. यापासून त्यांना वीज निर्मिती करता येते. आवश्यक वीज वापरून, उर्वरित वीज विकूनही ते अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. सौरऊर्जेच्या वापरामुळे वीज आणि डिझेलचा खर्चही कमी होईल आणि प्रदूषणात सुधारणा होईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन वीज सब-स्टेशनपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असावी.

प्रत्येक एकरावर एक लाखापर्यंत कमाई

शेतकरी स्वत: किंवा डेव्हलपरला भाडेतत्त्वावर जमीन देऊन सोलर प्लांट बसवू शकतात. सौर पॅनेलमधून निर्माण होणारी वीज सर्वप्रथम सिंचनाच्या कामात वापरता येईल. त्याशिवाय अतिरिक्त वीज वितरण कंपनीला विकून 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळवता येते. सौर पॅनेल 25 वर्षे टिकेल आणि देखभाल करणे सोपे आहे. यामुळे जमीन मालक किंवा शेतकऱ्याला प्रति एकर 60 हजार ते 1 लाख रुपये दरवर्षी मिळू शकतात.

सब्सिडी कशी मिळता येईल?

तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? तर मग आज आपण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी जाणून घेणार आहोत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी देतात. तर 30 टक्के बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी आपल्या शेतात सौरपंपाद्वारे सिंचन करू शकतील. तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in/ वर जाऊन त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी फॉर्म भरल्यानंतर, तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल जसे की आधार कार्ड, खसरासह जमिनीची कागदपत्रे, एक घोषणापत्र, बँक खाते तपशील अशी कागदपत्रे तुम्हाला येथे सबमिट करावी लागतील.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles