3.3 C
New York
Monday, November 17, 2025

Buy now

spot_img

कैद्यांच्या धर्मांतर प्रकरण भोवलं; वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

बीडच्या कारागृहातील कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या आणि याच प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.

 

कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांना उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठविण्यात आले आहे. बीड कारागृहात आल्यापासून पेट्रस गायकवाड कायम वादग्रस्त ठरले होते. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खाजगी कामे करून घेणे, यासोबतच पेट्रस गायकवाड वर सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कारागृहातील कैद्याच्या वकिलांनी तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर शासनाने त्यांची उचलबांगडी केली आहे.

 

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह  अधीक्षकांवर गंभीर आरोप केला होता. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. या पाठोपाठ बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन  करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला होता. त्यांनतर बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिणामी आता  याप्रकारणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles