24.1 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कृषी पदवीधर तरुणांची मदत घेणार – मंत्री अब्दुल सत्तार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल, तर पंचनामे करण्यासाठी बी. एसस्सी. (अ‍ॅग्री) व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करून घेता येईल का, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप परत मागे घेतला नाही, तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली. कृषी कार्यालयाच्या वतीने मिलेट दौडच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री सत्तार म्हणाले, की राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles