Home क्राईम दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले…

दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले…

0

बीड |

एका प्रियकरासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा.लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे सारे कारनामे उघड झाले आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

 

आयोध्या ही काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती. तरीही पोलिस होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती बीडमध्ये तयारी करत होती. वृंदावणी हिचे एकासोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख आयोध्या हिच्याशी झाली आणि त्यानंतर त्याने वृंदावणीला बाजूला करून आयोध्याशी बोलणे सुरू केले. आयोध्या हिच्या पतीचे चार वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात होता. १९ ऑगस्ट रोजी सकाळी तिने आयोध्याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी वाद वाढल्यावर आयोध्या ओरडू लागली, त्यामुळे संतापलेल्या वृंदावणीने तिचा गळा दाबून खून केला.

 

मृतदेह लपवण्यासाठी खोक्यात भरला. मुलगा शाळेतून आल्यावर ‘कचरा टाकायचा आहे’ असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्याकडून स्कूटी घेतली आणि मुलाला चालवायला दिली. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर ती स्कूटी घेऊन शेजाऱ्याला परत दिली.

 

दरम्यान, आयोध्या बेपत्ता झाल्याची नोंद २० ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी तात्काळ वृंदावणीची चौकशी सुरू केली. तिने तब्बल पाच तास उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तिच्याच प्रियकराने पोलिसांना माहिती दिल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा चौकशीदरम्यान वृंदावणीने खुनाची कबुली दिली. या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वृंदावणी सतीश फरतारे हिला अटक केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

दरम्यान, मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती. माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत, असे म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे.

 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version