Home क्राईम मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप पत्रातून सर्वात मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली असून आका हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं उलगडा झाल्यानंतर आता त्याचे पाय आणखीन खोलात जाणार आहेत.

 

विष्णू चाटे दुसरा मुख्य आरोपी असल्याचं दोषारोप पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मारहाण करताना जयराम चाटेनं साथीदारांना व्हिडीओ कॉल केला होता. तर नांदूर फाटाजवळील तिरंगा हॉटेलवर सर्व साथीदारांची भेट झाली होती. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेने सुदर्शन घुलेला दिला होता, असा उल्लेखही दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

 

खंडणी, ॲट्रॉसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषारोप पत्रात करण्यात आलं आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत. असंही दोषारोप पत्रात उल्लेख आहे.

 

वाल्मिक कराड-मुख्य आरोपी

विष्णू चाटे- दुसरा मुख्य आरोपी

सुदर्शन घुले-आरोपी क्रमांक तीन

प्रतीक घुले- आरोपी क्रमांक चार

जयराम चाटे-आरोपी क्रमांक पाच

सुधीर सांगळे- आरोपी क्रमांक सहा

सिद्धार्थ सोनवणे- आरोपी क्रमांक सात

कृष्ण आंधळे- आरोपी क्रमांक आठ

 

वाल्मिक कराडने सर्व प्रकरण घडवून आणलं. माझी प्रत्येक मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली. SIT, मोक्का लावण्याची मागणी मीच केली होती. या प्रकरणात आणखी तपास करण्याची गरज आहे. डॉ. वायबसेची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे. कराड बाहेर असता तर बिश्नोईचा सख्खा मावस भाऊ झाला असता, कराड आत गेल्यानं आता गँग नाही चालवणार बीडमध्ये प्रचंड बेकारी झाली अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे.

 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट दिल्याचा दावा देशमुख कुटुंबाने केला होता. तारीख वेळेसंह काय सुविधा दिल्या याची पोलखोल केली होती.याचसंदर्भात आता देशमुख कुटुंबाने धक्कादायक दावा केलाय.

 

कारागृह प्रशासनाने हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा खळबळजनक आरोप देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खेडकर यांनी केला आहे. 22 फेब्रुवारी 2025 पासून पाठीमागील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून.

 

कॅमेराच नादुरुस्त होता असा दाखवण्याचा प्रयत्न करणे सुरू आहे अशी माहिती दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकाराची देशमुख कुटुंब आज कारागृह महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.या अगोदर देशमुख कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेची मागणी देखील केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version