Home Uncategorized जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाने मला फसवलं- साहेबराव दरेकर

जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाने मला फसवलं- साहेबराव दरेकर

0

जयंत पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाने मला फसवलं म्हणून मी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरत असल्याचे मत बीडच्या आष्टी मतदारसंघात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केले.

 

तसेच राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम करूनही निष्ठावंतांना टाळलं जात असल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. यात आज बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात साहेबराव दरेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षातील नेते व पक्षावर निशाणा साधला आहे.

 

 

जयंत पाटील आणि बजरंग सोनवणे यांनी मला उमेदवारी देऊ असं शेवटपर्यंत आश्वासन दिलं. तुम्ही आष्टीला जा असं म्हणाले. मात्र आता दोन दिवसापूर्वी त्यांनी तिकीट दुसऱ्याला जाहीर केलं. शेवटपर्यंत त्यांनी तिकीट देतो, म्हणून मला फसवलं. यामुळे आता कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून आता मी जिंकण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचे दरेकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version