Home Uncategorized कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक

कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक

0

पाटोदा येथील महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

 

ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान बांगर यांना ही अटक करण्यात आली आहे. रामकृष्ण बांगर यांनी शैक्षणिक संस्था, दूध डेरी, महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील आपली छाप उमटवली होती. मात्र, राजकीय हितसंबंधाचा वापर करून सहकारी संस्थांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. बीड जिल्ह्यात महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा गुन्हा त्यांच्यासह 41 जणांवर दाखल झाला होता. गेल्या 30 ते 40 वर्षापासून अनभिषिक्त सम्राट बनलेल्या रामकृष्ण बांगर यांचे कुटुंब फरार झाले होते. ,

 

 

अखेर रामकृष्ण बांगर यांच्यावर कलम 420, 409, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन घरी आलेल्या असताना 8 ऑक्टोबर रोजी घरातून पकडले होते. दरम्यान या प्रकरणी पाटोदा पोलीस अधिक तपास करीत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान ही कारवाई झालेला राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना देखील पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे. 13 कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

सन 2011 ते 2015 कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये 13 कोटींचा बनावट दस्तावेज सात करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्यानंतर अविनाश बांगर यांनाही अटक करण्यात आलीय. दरम्यान, सत्यभामा बांगर यांनी कोणतीही कागदपत्रं न घेता, तारण न घेता बनावट कागदपत्रं तयार करून ते खर असल्याचं भासवून 13 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. या प्रकरणात बांगर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी सत्यभामा यांनाही अटक केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version