Home ताज्या बातम्या पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे...

पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढा – अमित शहाचें राज्यातील नेत्यांना आदेश

0

ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा इच्छुकांकडून होणारी बंडखोरी टाळण्यावर भाजपचा भर असणार आहे. पक्षातील बंडखोरी टाळण्यावर भाजप नेत्यांनी भर द्यावा.. नाराज उमेदवारांची तुम्ही सगळ्या प्रकारे समजूत काढ, राज्यात महायुतीच सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, त्यासाठी मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, बंडखोरी रोखण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करा. बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवाव, अशा सूचना राज्यातील नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत .

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी महायुतीचा एकच जाहीरनामा असणार आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळा जाहीरनामा सादर करणार नाहीत. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रित जाहीरनामा पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष स्वतंत्र प्रचार करणार नसून एकत्रच प्रचार करणार आहेत.

भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं आपल्या पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र अजूनही राज्यात काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत. ज्या मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. त्या मतदारसंघावर महायुतीमधील एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केला आहे. या मतदारसंघात उमेदवार ठरत नसल्यामुळे आता हा तिढा दिल्लीच्या दरबारात सुटण्याची शक्यता आहे.

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये अमित शाह यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही असे इच्छूक बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

.

बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान

दरम्यान महायुतीसमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. ज्या इच्छुकांना विधानसभेचं तिकिट मिळालं नाही ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून भाजप नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न करा, बंडखोरी होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये बंडखोरांची समजूत काढा. राज्यातील प्रमुख नेत्यांनी बंडखोरीवर लक्ष ठेवा अशा सूचना महायुतीच्या बैठकीमध्ये अमित शाह यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version