Home Uncategorized राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी

राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी

0

आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेल्या प्रकाश सोळंके यांना अजित पवारांनी मैदानात उतरवलं आहे.

 

राजकारणात निवृत्ती जाहीर केलेल्या प्रकाश सोळंके यांना अजित पवारांनी मैदानात उतरवले आहे. योग्य वयात निवृत्त व्हायला पाहिजे, असे आमदार प्रकाश सोळंके यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटले होते. मात्र, आज त्यांचं नाव यादीत जाहीर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचील दिग्गज नेत्यांच्या फळीतील एक नाव म्हणजे, प्रकाश सोळंके . त्यांनी राष्ट्रवादीच्या काळात अनेक मंत्रीपदंही भूषवली आहेत. गेल्या निवडणुकीत एका सभेतील भाषणादरम्यान, 2024 ची निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं होतं. 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. पण, त्यावेळी मंत्रीपदाची माळ प्रकाश सोळंकेंच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे पुढे अनेक दिवस सोळंकेंचं ‘राजीनामा नाट्य’ सुरू होतं. पण, त्यांना मंत्रीपद मिळालंच नाही. अखेर त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मतदारसंघात कामं करायला सुरुवात केली होती. मात्र, 2024 ची विधानसभा लढवणार नसून राजकीय निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version