Home ताज्या बातम्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडात साथ दिलेल्या किती...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

0

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण ४५ जणांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या उमेदवारीचीही घोषणा केली आहे. तसेच दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह काही विद्यमान आमदारांनाही संधी दिली आहे. भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली आहे.शिदेंच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.

 

माहिममधून आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. राजापूर मतदारसंघात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना संधी देण्यात आली आहे. पैठणमध्ये विद्यमान खासदार संदिपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे याला संधी दिली आहे. तर खानापूरमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना उतरवण्यात आले आहे.

 

 

शिवसेनेच्या पहिल्या यादीत कोणाची नावे?

 

एकनाथ शिंदे- (कोपरी पाचपाखाडी)

साक्री – मंजुळाताई गावित

चोपडा – चंद्रकांत सोनावणे

जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील

एरंडोल – अमोल चिमणराव पाटील

पाचोरा – किशोर पाटील

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील

बुलढाणा – संजय गायकवाड

मेहकर – संजय रायमुलकर

दर्यापूर – अभिजीत आनंदराव अडसूळ

रामटेक – आशिष जैस्वाल

भंडारा – नरेंद्र भोंडेकर

दिग्रस – संजय राठोड

नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर

कळमनुरी – संतोष बांगर

जालना – अर्जून खोतकर

सिल्लोड – अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय शिरसाट

पैठण – विलास भुमरे

वैजापूर – रमेश बोरनारे

नांदगाव – सुहास कांदे

मालेगाव बाह्य – दादाजी भुसे

ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक

मागाठाणे – प्रकाश सुर्वे

जोगेश्वरी पूर्व – मनीषा रवींद्र वायकर

चांदिवली – दिलीप भाऊसाहेब लांडे

कुर्ला – मंगेश कुडाळकर

माहिम – सदा सरवणकर

भायखळा – यामिनी जाधव

कर्जत – महेंद्र थोरवे

अलिबाग – महेंद्र हरी दळवी

महाड – भरतशेठ गोगावले

उमरगा – ज्ञानराज चौगुले

परांडा – तानाजी सावंत

सांगोला- शहाजी बापू पाटील

कोरेगाव – महेश शिंदे

पाटण – शंभूराज देसाई

दापोली – योगेश कदम

रत्नागिरी – उदय सामंत

राजापूर – किरण सामंत

सावंतवाडी – दीपक केसरकर

राधानगरी – प्रकाश आबिटकर

करवीर – चंद्रदीप नरके

खानापूर – सुहास बाबर

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version