Home ताज्या बातम्या सोशल मीडियावर व्यक्त होणार्या नेटकऱ्यांना पोलिसांचा  कारवाईचा इशारा; आदर्श आचारसंहितेचा भंग...

सोशल मीडियावर व्यक्त होणार्या नेटकऱ्यांना पोलिसांचा  कारवाईचा इशारा; आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पोलिस अॅक्शन मोडवर 

0

 बीड |

 

विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविल्या जाऊ नयेत. उमेदवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जाऊ नये यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होणार्या नेटकऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी ग्रुप अॅडमीन आणि सभासदांना याबाबत नोटीस बजावली आहे.

 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पाऊले उचलली आहेत. मतदान आणि प्रचारादरम्यान कोणीही गैरकृत्य करू नयेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांना जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल.तसेच ही नोटीस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असेही खेडकर यांनी बजावले आहे

 

 

 

सेटिंग ओन्ली फॉर अॅडमीन करा

 

सोशल मीडियावरील कोणत्याही ग्रुपवर आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या पोस्ट टाकल्या जाऊ नयेत यासाठी ग्रुप अॅडमीनने सर्व ग्रुपची सेटिंग ओन्ली फॉर अॅडमीन करावी, असे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी म्हटले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

 

कोणत्याही उमेदवाराची, कुटुंबीयांची सामाजिक स्तरावर अवहेलना होईल, अशी आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करू नका. फोटो, व्हिडिओ (मॉर्फिंग) बनवून प्रसारित करू नका. अशा पोस्टवर सोशल मीडियात व्यक्तही होऊ नका. मतदारांचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्म, जातींबाबत द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट करू नका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन सोशल मीडियावर करू नका. दोन गटांत तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाळाव्यात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version