Home ताज्या बातम्या अर्ज भरायला उरले 14 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस; 39 दिवसांत...

अर्ज भरायला उरले 14 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस; 39 दिवसांत निवडणूक संपणार

0

भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीयं. आयोगाच्या घोषणेनूसार राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.विशेष म्हणजे आजपासून बरोबर 39 दिवसांत राज्यात निवडणुकीचा कार्यक्रम आटोपणार आहे. तर आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झालीय. एकूणच निवडणुकीचा कार्यक्रम पाहता , बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस तर अर्ज भरण्यासाठी फक्त 14 दिवस उरल्याचं दिसून येत आहे.

 

 

विधानसभेसाठी उमेदवारांना येत्या 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरता येणार आहे तर उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. त्यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबरला राज्याचा नवीन कारभारी कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

 

 

 

विधानसभा निवडणुकीचं शेड्यूल कसं असणार?

महाराष्ट्रात मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.

20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल.

15 व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी 23 नोव्हेंबरला ठरणार.

या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर

26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ

उमेदवारांकडे अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे 14 दिवस

छाननी 30 ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ, एकूणच उमेदवारांना प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे प्रचारासाठी जवळपास एक महिना मिळणार

आजपासून 39 दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार

अर्जांची छाननी ते माघारीत 4 दिवसांचा वेळ

निवडणुकीत उमेदवाराने बंड केल्यास समजवण्यासाठी 4 दिवसांचा वेळ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version