Home आष्टी ॲड. नरसिंह जाधव यांनी घेतली शरद पवारांची भेट; जोमाने कामाला लागण्याचे आदेश

ॲड. नरसिंह जाधव यांनी घेतली शरद पवारांची भेट; जोमाने कामाला लागण्याचे आदेश

0

पाटोदा | प्रतिनिधी

 

आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार ॲड. नरसिंह जाधव यांना मतदार संघातून जन सामान्यांची पसंती मिळत असल्याने शरद पवार साहेबांनी बारामतीला बोलावून घेऊन आणखी जोमाने काम सुरु ठेवण्याचे आदेश देत आर्शिवाद दिले आहेत. यावेळी ॲड. नरसिंह जाधव आपण गेल्या वर्ष भरात मतदार संघात केलेल्या संपर्क दौऱ्याचा अहवाल सादर केला.

आष्टी पाटोदा व शिरूर मतदार संघातून ॲड. नरसिंह लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार विधी सेलचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख यांनी बुधवार शरदचंद्रजी पवार साहेब यांची विद्या प्रतिष्ठान बारामती येथे भेट घेऊन आष्टी मतदार संघातील त्यांच्या मतदार गाव भेटी संदर्भामध्ये मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भामध्ये काय कल आहे. या संदर्भात माहिती दिली. तसेच आपल्या उमेदवारीचे जनतेत स्वागत होत असून, मतदारांत परिवर्तनाचे वारे असून, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी केली. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पाटोदा तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव हे देखील उपस्थित होते.

 

आष्टी मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने ॲड. नरसिंह जाधव यांना उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब तसेच संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेऊन आजपर्यंत केलेला कामाचा सर्व आढावा पक्ष श्रेष्टीकडे ॲड. नरसिंह जाधव व शिवभूषण जाधव यांनी सादर केला. तसेच मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील वकील संघ व आष्टी, पाटोदा, शिरूर, येथील वकील संघातील वकिलांनी ॲड. नरसिंह जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस पत्र देखील शरदचंद्रजी पवार सादर केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version