Home क्राईम बीडमध्ये 11 वर्षीय चिमुकलीवर मौलानाकडून बलात्कार

बीडमध्ये 11 वर्षीय चिमुकलीवर मौलानाकडून बलात्कार

0

बीड |

बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही काही शाळांमध्ये शिक्षकांकडूनच मुलींवर अत्याचार केल्याचे प्रकारही उघडकीस आले. दरम्यान, आता बीड शहरात एका ११ वर्षांच्या चिमुकलीवर धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलानाने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दिली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अत्याचाराचे आरोप असलेल्याचे नाव शेख रियाज असं आहे. ३५ वर्षीय रियाज हा मोहम्मदीया कॉलनीतील मखतबमध्ये धार्मिक शिक्षण देतो. याठिकाणी १०० ते १५० मुले मुली शिक्षण घेतात. एका मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर आता त्याने असा प्रकार आणखी काही मुलींसोबत केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

 

मौलानाकडून मुलीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर पेठबीड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. ११ वर्षीय पीडिता मखतबमध्ये जाण्यास नकार देऊ लागली. त्यामुळे आई-वडीलांनी तिची चौकशी केली. कशामुळे जाण्यास नकार देत आहेस याची विचारणा केली. यावेळी मौलानाकडून सातत्याने अत्याचार होत असल्याची माहिती तिने आपल्या आई वडीलांना दिली. त्यानंतर पीडितेला घेऊन नातेवाईकांनी पेठबीड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.

 

शहरातील पेठ बीड हद्दीतील मोमीनपुरा भागात ११ वर्षीय मुलीवर धार्मिक शिक्षण देणाऱ्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात घटनेचे गांभीर्य पाहता पेठ बीड पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला असून नराधमा विरुद्ध कठोर कारवाई करा अशी मागणी होत आहे. मुस्लिम धार्मिक शिक्षण देणाऱ्या नराधमाने ११ वर्षीय चिमुकलीसोबत दुष्कृत्य केले. त्यामुळें संताप व्यक्त केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version