Home क्राईम पोटच्या मुलीसह नातीवर नराधमाचा अत्याचार

पोटच्या मुलीसह नातीवर नराधमाचा अत्याचार

0

बीड |

जिल्हा हादरावून टाकणारी एक घटना बीडमध्ये समोर आली आहे. पोटच्या मुलीसोबत सातत्याने जबरदस्तीने संबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आता आपल्या नातीशी बळजबरी करणाऱ्या आजोबाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणूसकीला काळिमा फसणाऱ्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजीनगर पोलीस सध्या या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितीने दिलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. दत्तात्रय कवचट असे त्या निर्दयी बापाचे नाव आहे. त्याने आपल्या पीडित मुलीशी लहानपणापासून संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पीडिता अल्पवयीन असताना तो तिच्या अंगाशी सातत्याने खेळत असायचा. ती जसजशी मोठी होतं गेली तसंतसे त्याने आपल्याच मुलीशी कुकर्म साधण्यास सुरुवात केली. अनेक वर्ष नराधम बापानेचे तिचे शोषण केले. पीडिता लग्नाला आल्यानंतर तिचे लग्न होऊ नये यासाठी तो मुद्दाम प्रत्येकवेळी खोडाही घालायचा असे फिर्यादित म्हटले आहे. मात्र तरीही एका मुलाशी तिचे लग्न जमले नंतर ती आपल्या सासरी गेल्यानंतर आपल्या घरी येताना कायम नवऱ्याला घेऊन यायची आणि मुक्कामी थांबत नसायची. दरम्यान पीडितेचे लग्न झाल्यानंतर घरात असलेल्या तिच्या भावाच्या लहान मुलीसोबत बापाने संबंध बनवायला सुरु केले. काही दिवसांपासून भावाची मुलगी घरात कोणालाच बोलत नसल्याने पीडितेला याचा संशय आला. त्यामुळे तिन्हे व तिच्या नवऱ्याने त्या मुलीला बीडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता याचे बिंग फुटले. त्या नराधम बापाने मुलीवर जबरदस्ती केल्यानंतर आपल्या नातीशी ही संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने बीड हादरून गेले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version