Home ताज्या बातम्या विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन!

विधानसभेसाठी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले? यात्रा काढत मतदारसंघात करणार शक्तिप्रदर्शन!

0

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुका मविआमध्ये राहूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच येत्या नऊ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवनेरी किल्ल्यातून शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ज्या मतदारसंघातून यात्रा जाईल, त्या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार देण्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीसाठी अनिल देशमुख हे आज (ता. ३१ जुलै) अमरावतीला आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आमच्या पक्षाची ज्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, त्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार असून तेथील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे.

 

त्याचप्रमाणे या यात्रेतून महायुती सरकारच्या कारभाराची माहितीही जनतेला देणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (श. प.) किती मतदारसंघात उमेदवार देणार आहे, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे नमूद करीत ते पुढे म्हणाले की, यात्रेदरम्यान होणाऱ्या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत किती जागा हव्यात ते स्पष्ट केले जाईल. तथापि ज्या मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे, ते मतदारसंघ आमच्या पक्षासाठी मागण्याची भूमिका पक्षाची असल्याचे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version