Home ताज्या बातम्या राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

मुंबई|

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतात. चालू विधानसभेची मुदत याच वर्षी संपणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहेत. 25 जून पासून 2 जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. पाच जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान पार पडणार आहे. 12 जुलै रोजीच होणार पाच वाजल्यानंतर मतमोजणी सुरुवात होईल.

निवृत्त होणारे सदस्य कोण?

सध्या विधान परिषदेवर असणारे 11 सदस्य पुढच्या महिन्यात 27 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील विधान परिषदेतील या 11 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version