Home क्राईम सासूनं जाब विचारल्यानं सुनेने दोन मुलांना संपवलं; स्वत:ही प्यायली विष

सासूनं जाब विचारल्यानं सुनेने दोन मुलांना संपवलं; स्वत:ही प्यायली विष

0

अंबाजोगाई |

पोटच्या दोन लेकरांना विष पाजून आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई इथं घडलीय. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून आई वाचली आहे. स्वयंपाक जास्त का केला असं सासूने विचारल्यानं रागाच्या भरात महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.

कार्तिक आणि प्रांजल या दोन आणि तीन वर्षांच्या मुलांना तिनं विषारी द्रव्य पाजलं. त्यानतंर स्वत:ही विष प्राशन केलं. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून महिलेवर उपचार केले जात आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,कौशल्या भीमराव दोडतले असं महिलेचं नाव आहे. तिला सासूने स्वयंपाक जास्त का केलास असा जाब विचारला. यामुळे रागावलेल्या कौशल्याने मुलांना विषारी द्रव्य पाजलं. मुलांच्या नाकातून रक्त यायला लागलं आणि ती हालचाल करत नसल्यानं कौशल्याचे पती भीमराव यांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्याचवेळ कौशल्याने दुसऱ्या खोलीत जाऊन विष प्राशन केलं.

कार्तिक २ वर्षांचा तर प्रांजल ३ वर्षांची होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं होतं. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. कौशल्यावर उपचार केले जात असून तिची प्रकृती स्थिर आहे. भीमराव दोडतले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कौशल्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कौशल्याचे पती बाहेर गेले असताना घरात सासूसोबत वाद झाला. त्यावेळी सासूने जेवण जास्त का केलेस असं विचारलं. याच रागाच्या भरात तिने दोन्ही मुलांना विष पाजलं. पती घरी आला तेव्हा पत्नी कौशल्या खोलीत रुसून बसल्याचं आईने सांगितलं. खोलीत गेल्यानंतर कौशल्याचा पती भीमराव यांना मुलांच्या नाकातून रक्त आणि फेस येत असल्याचं दिसलं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version