Home ताज्या बातम्या बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी होणार मतदान

बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी होणार मतदान

0

बीड | प्रतिनिधी

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन देशात विविध टप्प्यांमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यंदा सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघांसाठीची निवडणुक प्रक्रिया देखील जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जिल्हयात १३ मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.

या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत ही २५ एप्रिलपर्यंत राहणार असून २९ एप्रिल पर्यंत माघार घेण्याची मुदत असेल. यानंतर वर नमूद केल्यानुसार १३ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

 

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने आधीच पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने मात्र अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आता निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे उमेदवारही जाहीर होतील अशी शक्यता आहे. तर, अन्य पक्ष व अपक्ष उमेदवार देखील रिंगणात राहतील अशी अपेक्षा आहे. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापणार असल्याचे देखील निश्‍चीत झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version