Home ताज्या बातम्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

0

मुंबई |

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अनिल पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर उद्या याप्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे.

शिवसेनाही हायकोर्टात

दरम्यान याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले यांनी योग्य पद्धतीने व्हीप न बजावल्यामुळे ठाकरेंच्या आमदारांना अपात्र करता येत नसल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना हायकोर्टात गेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही शिंदेंचे आमदार अपात्र न केल्यामुळे सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता हे प्रकरण हायकोर्टात चालवायचं का सुप्रीम कोर्टात, याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version