Home ताज्या बातम्या सौताडा परिसरात बिबट्याचे दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सौताडा परिसरात बिबट्याचे दर्शन; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

0

पाटोदा तालुक्याततील सौतडा परिसरात बिबट्याचे दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

 

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे झाडाझुडपातून जाणाऱ्या एका रस्त्यावर गुरूवारी सायंकाळच्या दरम्यान एक बिबट्या मुक्त संचार करत होता. यावेळी तेथून जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने शूट केलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी

दरम्यान,मागील अनेक महिन्यांपासून शेळ्याचा फडशा बिबट्याने पाडला आहे.मात्र, मानवी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या नाहीत. परंतु या परिसरात बिबट्या अचानक कुठेही नजरेस पडू शकतो. हे सौताडा येथील घटनेवरून दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version