Home क्राईम रक्षकच जेव्हा भक्षक बनतो; पोलिस कर्मचार्‍याकडून महिलेवर बलात्कार  

रक्षकच जेव्हा भक्षक बनतो; पोलिस कर्मचार्‍याकडून महिलेवर बलात्कार  

0

बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून, सर्व सामन्याचे रक्षकच भक्षक होऊ लागले असल्याने आता कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बीड येथील मुख्यालयात असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने 24 वर्षीय महिलेला स्वत:च्या घरी नेहून तिच्यावर जबरदस्तीनेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याविषयी कोणाला काही सांगितल्यास तुझ्या घरच्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची व तुझ्यासह परिवाराला जिवे मारण्याची धमकी पिडीतेला दिली आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचार्‍याविरूध्द शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

अधिक माहिती अशी की, पोलिस कर्मचार्‍याची नियुक्ती पोलिस मुख्यालयात असल्याचे सांगितले. महिनाभरापूर्वीच असा काहीसा प्रकार घडला होता. या प्रकरणात काही पोलिस कर्मचार्‍यांची नावे समोर आली होती. मात्र यामध्ये कोणाची तक्रार न आल्याने कारवाई झाली नाही. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत एक 24 वर्षीय महिला संध्याकाळच्या सुमारास माहेरून आल्यानंतर रिक्षाची वाट पाहत उभी होती.त्याचवेळी पीडितेच्या गावातील तिच्या ओळखीचा पोलिस कर्मचारी मोटारसायकलवर त्याठिकाणी आला व पीडितेला जायचे का? असे विचारून तिला मोटारसायकलवर बसविले. त्यानंतर पीडितेला स्वत:च्या घरी नेहून तिला जबरदस्तीने आतमध्ये ओढले.त्यावेळी पोलिस कर्मचार्‍याच्या घरात कोणी नव्हते. त्यामुळे महीलेवर जबरदस्तीने अत्याचार केला.पोलिस कर्मचारी हनुमान श्रीराम कमवाडे याच्याविरूध्द कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version