Home क्राईम बी अँड सीच्या अधीक्षक अभियंत्याला सहा लाख 40 हजार रुपयांची लाच...

बी अँड सीच्या अधीक्षक अभियंत्याला सहा लाख 40 हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली पकडले

0

नांदेड |

रस्त्याच्या कामाचे टेंडर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करण्यासाठी गुत्तेदाराकडून सहा लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत, वरिष्ठ लिपिक विनोद केशवराव कंधारे यांच्याविरुध्द लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी राजपूत यांच्या घराची व कार्यालयाची झडती घेतली, तेव्हा रोख ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये आढलले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यांत रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगराव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड (ता.हदगाव, जि.नांदेड) या रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाले होते.

 

सुमारे 14 कोटी रुपयांचे काम होते. कामांच्या निविदा स्वीकृती शिफारशीसाठी तक्रारदार हे श्री. राजपूत यांना भेटले असता, दोन टेंडरचे 14 कोटी 10 लाख रुपये होतात. अर्धा टक्काप्रमाणे सात लाख रुपयांची मागणी श्री. राजपूत यांनी केली. पैसे दिले तर मुख्य अभियंता यांच्याकडे शिफारस करतो, असे त्यांनी गुतेदाराला सांगितले.

 

त्यानंतर तक्रारदार हे वरिष्ठ लिपीक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी व त्यांच्यासोबतचे लिपिक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25 हजार असे एकूण 50 हजार देण्याची मागणी केली. ही लाच असल्याचा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ आॅक्टोबर रोजी तक्रार दिली.

 

दरम्यान बुधवारी (ता.एक) तक्रारदार यांनी पुन्हा श्री.राजपूत यांची भेट घेतली. सात लाख रुपये जास्तीचे होत आहेत, काही कमी करा, अशी विनंती केली. तेव्हा सहा लाख रुपयांत तडजोड झाली. कंधारे यांना प्रत्येक टेंडरचे प्रत्येकी 20 हजार असे 40 हजार देण्यास सांगितले.

 

एकूण सहा लाख 40 हजारात तडजोड झाली, बुधवारी (एक नोव्हेंबर) मध्यरात्री १२ ते एक वाजेच्या दरम्यान श्री. कंधार सहा लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.यानंतर पोलिसांनी श्री. राजपूत यांच्या कार्यालयाची व घराची झडती घेतली असता, दोन्ही ठिकाणाहून ७२ लाख ९१ हजार ४९० रुपये पंचांसमक्ष जप्त केले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत

 

याप्रकरणी रात्री उशिरा राजपूत, कंधारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक गजानन बोडके, सहायक पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, काॅन्स्टेबर ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंढे, गजानन पवार, शेख अकबर, राजेश राठोड, अरशद खान, ईश्वर जाधव, गजानन राऊत, प्रकाश मामुलवार यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version