Home ताज्या बातम्या १४ तारखेला धुळे- सोलापूर महामार्ग राहणार बंद

१४ तारखेला धुळे- सोलापूर महामार्ग राहणार बंद

0

येत्या १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे धुळे-सोलापूर महामार्गावर होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेला राज्यभरातून लोक येणार आहे.या सभेला सुमारे ५ ते ६ लाख लोक येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाला असून शनिवार (दि.१४) ऑक्टोबर रोजी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे शनिवार (दि.१४) रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा होणार आहे.राज्याच्या कानकोपऱ्यातून लोक या सभेसाठीआपली हजेरी लावणार आहे.१०० एकरच्या जागेत हि सभा होणार आहे.या सभेसाठी ३० ते ३५ हजार वाहने येणार असून तब्बल ५ ते ६ लाख लोक येण्याची संभावना वर्तविण्यात आली आहे.होणाऱ्या सभेस मोठ्या प्रमाणात वाहने येणार असून वाहतूक कोंडी होण्याची दाट श्यक्य आहे.धुळे- सोलापूर महामार्गावर हि सभा होत असल्यामुळे.येत्या शनिवारी या मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली असून बीड-पाडळसिंगी-मादळमोही खरवंडी- पाथर्डी-शेवगांव- पैठण- छ. संभाजीनगर किंवा बीड- पाडळसिंगी खरवंडी- पैठण- छ. संभाजीनगर बीड-गढी- माजलगांव- आष्टी घनसांगवी- अंबड-जालना असे आवाहन बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version