Home क्राईम लग्नानंतरही विवाहितेने बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारणे सुरूच; पतीने उंदीर मारण्याचे विष पिले

लग्नानंतरही विवाहितेने बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारणे सुरूच; पतीने उंदीर मारण्याचे विष पिले

0

लग्नानंतरही विवाहितेने बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारणे सुरूच ठेवले. ही गोष्ट तिच्या पतीला कळाली, त्याने सामंजस्याची भूमिका घेत पत्नीला समजावून सांगितले. मात्र, तरीही पत्नीने बॉयफ्रेंडसोबत बोलणे तसेच त्याला भेटणे सुरूच ठेवल्याने कंटाळलेल्या पतीने उंदीर मारण्याचे विषप्राशन केले.कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील  गेवराई तालुक्यातील रूई येथे घडली. या प्रकरणी बीडच्या तलवाडा पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

 

सलीम मेहमूद शेख (वय 22, रा. रुई, ता. गेवराई) असं मयत पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सलीम याचा विवाह 25 मे 2023 रोजी अर्धामसला येथील तरुणीसोबत झाला होता. लग्न झाल्यापासून सलीमची बायको बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलायची.ही गोष्ट सलीमला कळाली, त्याने आपल्या बायकोला अनेकदा समज देखील दिली. मात्र तरी देखील तिने सलीमचं काहीही ऐकलं नाही. अखेर कंटाळून सलीमने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत सलीमचा भाऊ शाहरूख मेहमूद शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सलीमची पत्नी आयशा सलीम शेख, प्रियकर किरण पिंपळे यांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर किरण पिंपळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलीमची पत्नी आयशा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version