Home ताज्या बातम्या अरे पळपुट्या बॅनरवर नाव तरी लिहायचं; आव्हाडांचा मुंडेंना टोला

अरे पळपुट्या बॅनरवर नाव तरी लिहायचं; आव्हाडांचा मुंडेंना टोला

0

बीड |

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये आहेत. बीडमध्ये शरद पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. बीडमध्ये शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बॅनर्सही लावण्यात आले होते.या बॅनर्सवरुन जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्या पोस्टरवाल्या पळपुट्याला समजू द्या, पळपुट्या बॅनरवर नाव तरी लिहायचं. बीडकर कुणाबरोबर आहेत, हे आता समजेलचं. कुणावरही टीका करायची नाहीये. जे गेले ते गेले. पण आज मी सांगतो, विचारधारा कधीही बदलत नसते. पुरोगामी महाराष्ट्र शरद पवारांच्या खांद्यावर आहे. सत्ता आली काय, गेली काय, शरद पवारांना काही फरक पडत नाही. ८० ते ८६ शरद पवार सत्तेत नव्हते. सत्ता येते-जाते. पण विचारधारा बदलायची नसते. बाप बदलायचे नसतात. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version