Home बीड दुचाकीला कारची जोराची धडक; दुचाकीने पेटल्याने दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

दुचाकीला कारची जोराची धडक; दुचाकीने पेटल्याने दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

0

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन प्राध्यापकांवर काळाचा घाला

बीड |

शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या दोन प्राध्यापकांवर गुरुपौर्णिमेदिवशीच सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास नगर रोडवरील अपघातात काळाने घाला घातला. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्यामुळे सदरील प्राध्यापकांचे मृतदेह जळाल्याचे वृत्त असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 

शहादेव शिवाजी डोंगर (वय 50, रा.जाट नांदूर) आणि अंकूश साहेबराव गव्हाणे (वय 48) अशी मयत प्राध्यापकांची नावे असून ते शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत होते. सोमवारी सकाळी बीड येथून दुचाकीवरून शिरूरकडे जात असताना नगर रोडवरील बीपीएड कॉलेज जवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला कार क्र. (एम एच 14/ जेई 5372) ने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दोघांचे मृतदेह जळल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version