Home ताज्या बातम्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 20 ते 25 जणांचा होरपळून...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 20 ते 25 जणांचा होरपळून मृत्यू

0

सिंदखेड राजा |

समृध्दी महामार्गवर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील 20 ते 25 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे.हा अपघात बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर झाला.

विदर्भ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 29 बी ई 1819 ही 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील अंदाजे 20 ते 25 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरचेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

काचा फोडून काही प्रवासी बाहेर 

विदर्भ ट्रॅव्हल्स पलटी होऊन अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅव्हल्स मधील काही प्रवासी काचा फोडून बाहेर आले होते. चार ते पाच प्रवाशासह ट्रॅव्हल चालक व वाहक सुखरुप बचावले आहे.

 

मृतकामध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा समावेश 

विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये कॉलेजच्या मुलींचा व लहान मुलांचा सुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मधील बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version