Home क्राईम रस्त्यावरून वाद झाला अन् भांडणात जीव गेला; गुन्हा दाखल 

रस्त्यावरून वाद झाला अन् भांडणात जीव गेला; गुन्हा दाखल 

0

कुसळंब येथील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाटोदा |

तालुक्यातील कुसळंब येथील भावकीतील दोन शेतकर्‍यांमध्ये शेतात जाणार्‍या रस्त्यावरून वाद झाला. या भांडणात गोरख पवार या शेतकर्‍याच्या डोक्यात दगड मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पाटोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील शेतकरी संतोष उर्फ पिंटु आजिनाथ पवार (45) व गोरख पवार (35) यांच्यामध्ये मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शेतात जाणार्‍या रस्त्यावरून वाद सुरू झाला. यावेळी संतोष पवार याने मयत गोरख यांना आमच्या शेतातून तुम्हाला जावू नका असे सांगितले होते. तरी पण तुम्ही आमच्या शेतातून ट्रॅक्टर का घेवून आलात या कारणावरून फिर्यादी साक्षीदार व मयत यांना शिविगाळ केली व फिर्यादीचे पती मयत गोरख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डोक्यामध्ये दगडाने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. यावेळी फिर्यादी व साक्षीदार ताराबाई भांडणाची सोडवासोडव करण्यासाठी गेली असता यातील नमुद आरोपींनी त्यांची हातातील दगड फिर्यादीच्या डोक्यात मारला व डाव्या कानावर हाताने बुक्की मारून जखमी केले.

 

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, एपीआय प्रताप नवघरे, पीएसआय राहूल पतंगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी संतोष पवारला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात फिर्यादी शोभा भ्र.गोरख पवार यांचे तक्रारीरूवन मंगळवार, दि. 27 जून रोजी गुन्हा रजि.नं. 138/2023 कलम 302, 324, 323, 504 भादंवी नुसार आरोपी संतोष उर्फ पिंटु आजीनाथ पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक पतंगे हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version