Home क्राईम “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” संजय राऊत यांना धमकी

“सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” संजय राऊत यांना धमकी

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोळकर होणार,’ अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.“सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.

 

“गुरूवारी ( ८ जून ) ४ ते ४.१५ च्या दरम्यान तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू,” असं सुनील राऊत यांनी सांगितलं.

 

“संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी…”

 

“गेले अनेक दिवस झाले, अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सरकारला त्याची जाणीव करून दिली आहे. पण, सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचं वाटतं,” असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

 

“जर काही झालं, तर त्याची जबाबदारी.”

 

शरद पवारांना मिळालेल्या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय. जर काही झालं, तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल”, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version