22.9 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

spot_img

आमदारांच्या अपात्रतेबाबत आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार- राहुल नार्वेकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. माजी मंत्री दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते.

राज्यातील सत्ता संघर्षासत्ता संघर्षाबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या राजकीय डावपेचावर टीका करत, सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे.

 

पण हा निर्णय देताना न्यायालयाने निश्चित कालावधी स्पष्ट केला नाही. दोन्ही शिवसेनेच्या आमदारांना नोटीसा देऊन तसेच त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आपण याबाबत निर्णय घेऊ, असे नार्वेकर सांगत होते. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय घेणार आणि कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे सूचक वक्तव्य करून सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लवकर घेणार असल्याचे स्पष्ट केले.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles