बीड |
दादाहरी वडगांव मध्ये किराणा दुकानात पोलिसांनी छापा टाकून तीन लाख 70 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन येथे दोघा जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 23/ रोजी संभाजीनगर पो.स्टे. परळी येथील पोलीस उपनिरीक्षक ए. टी. शिंदे हे स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना संभाजी चौक इटके कॉर्नर येथे एक अल्पवयीन स्कूटीचालक स्कुटीवर पिशवी लटकवून संशयीतरीत्या येतांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाने त्यास थांबवून त्याचे नाव गांव विचारुन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये गुटख्याचे चार पुडे मिळून आले. त्यावेळी पोलीस पथकाने सदरचा गुटखा कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुटखा दादाहरी वडगांव येथील उद्धव गोलेर यांचे किराणा दुकानातून आणला असल्याचे सांगीतले. त्यावरुन पोउपनि शिंदे यांनी दादाहरी वडगांव येथील उद्धव पंढरीनाथ गोलेर यांचे किराणा दुकानात छापा टाकला असता त्यांचे दुकानात 3,70,378/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळून आला. त्याच प्रमाणे 15000/- रुपये किंमतीची होंडा अॅक्टीवा स्कुटी क्रमांक एमएच 44 वाय 8424 असा एकूण 3,85,378/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान या बाबत अन्न व औषध प्रशासन बीड येथील अनुराधा ज्ञानदेव भोसले अन्न सुरक्षा अधिकारी यांना माहीती देवुन त्यांनी सदर मुद्देमालाचा सविस्तर पंचनामा करुन त्यांचे फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे 1 उद्धव पंढरीनाथ गोलेर रा. दादाहरी वडगांव ता. परळी जि. बीड व एक अल्पवयीन याचे विरुद्ध गु.र.नं. 126/2025 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2)(a), 59 सह कलम 123,233,274,275 भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.टी. शिंदे, पोह/1253 नागरगोजे, पोह/416 पठाण, पोकों/710 चव्हाण, पोकों/2054 ठोंबरे, पोकों/1476 पेरडलवार तसेच अन्न व औषध प्रशासनच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अनुराधा ज्ञानदेव भोसले यांनी केली आहे