Home पाटोदा स्नेहा वाघमारेचे घवघवीत यश; दहावीच्या परिक्षेत घेतले 95.60 टक्के गुण

स्नेहा वाघमारेचे घवघवीत यश; दहावीच्या परिक्षेत घेतले 95.60 टक्के गुण

0

पाटोदा । प्रतिनिधी

मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परिक्षेत 500 गुणांपैकी 478 (95.60 टक्के)गुण मिळवित कु. स्नेहा केशव वाघमारे हिने घवघवीत यश संपादन केले असून, स्नेहा वाघमारे ही पाटोदा येथील भामेश्‍वर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि मित्र परिवाराने कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने मार्च 2023 मध्ये दहावीच्या परिक्षा घेतल्या होत्या. त्या परिक्षेचा निकाल शुक्रवार दि. 2 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या परिक्षेमध्ये कु. स्नेहा केशव वाघमारे हिने इंग्रजी विषयात 100 पैकी 97 तर सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 97 तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात 100 पैकी 95 तर गणितामध्ये 100 पैकी 95 गुण घेत 95.60 टक्के मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक आणि मित्र परिवाराने त्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version