Home महाराष्ट्र निराधारांना १,१९७ कोटींचे अर्थसाहाय्य, लाभार्थ्यांना निधी वाटपाचे समाज कल्याण विभागाचे आदेश

निराधारांना १,१९७ कोटींचे अर्थसाहाय्य, लाभार्थ्यांना निधी वाटपाचे समाज कल्याण विभागाचे आदेश

0

राज्यातील निराधार व्यक्तींना समाज कल्याण विभागाने आधार दिला असून, निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाने ११९७ कोटी रुपये निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना नुकताच उपलब्ध करून दिला आहे. हा निधी तत्काळ लाभार्थ्यांना वाटप करावा, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

 

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४४५ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ७५२ कोटी असा एकूण १९९० कोटी निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व २१ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थीस महिन्याला एक हजार रुपये दिले जातात.

 

कोणाला लाभ मिळतो

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतः या चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या; परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारीत व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षांवरील अविवाहित तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजार रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थींना एक हजार महिन्याला दिले जातात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version