Home क्राईम श्री संत तुकाविप्र संस्‍थानात चोरट्यांच्या हल्‍ल्‍यात २ महिला जखमी

श्री संत तुकाविप्र संस्‍थानात चोरट्यांच्या हल्‍ल्‍यात २ महिला जखमी

0

बीड तालुक्यातील मौजे अंजनवती येथील येडे वस्ती स्थित श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात आज (बुधवार) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला.

यावेळी प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांनाही चोरट्यांनी मारहाण केली. त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेकनूर पोलिस घटनास्थळी ठाण मांडून असून, स्थानिक गुन्हे शाखेने श्वानपथकाच्या साहाय्याने जागेची पाहणी केली.

घरात झोपलेले पुजारी कृष्णा जोशी यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली. त्याचवेळी शेजारच्या खोलीमध्ये झोपलेल्या कृष्णा जोशी यांच्या पत्नी गीता जोशी (वय ४५ ) यांच्या डोक्यात प्रहार केला. या मारहाणीत त्‍यांच्या डोळ्याखाली जखम झाली असुन, सासु उषा प्रल्हाद लेले यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर बीड येथील फिनिक्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या चोरट्यांनी दीड तोळे सोने व काही रक्कम लंपास केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. नेकनुर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शेख मुस्तफा , पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, हवालदार राख तसेच लिंबागणेश पोलिस चौकीचे नागरगोजे, हवालदार सचिन डिडुळ घटनास्थळी ठाण मांडून असुन, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय दुलत व त्यांची टीम तसेच श्वानपथक दाखल झाले आहे. या घटनेचा पुढील तपास शेख मुस्तफा हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version