Home क्राईम दिराने वहिनीशी अश्लील चाळे करत केली शरीरसुखाची मागणी

दिराने वहिनीशी अश्लील चाळे करत केली शरीरसुखाची मागणी

0

बीड |

वहिनी “तु खूप चांगली दिसतेस, मला आवडतेस” असे म्हणत दिराने वहिनीचा विनयभंग केल्याची घटना धारूर तालुक्यातील दिंद्रुड येथे घडली आहे. विधवा वहिनी आंघोळीसाठी गेलेली असताना दिराने बाथरुमध्ये प्रवेश केला आणि वहिनीशी अश्लील चाळे करत शरीरसुखाची मागणी केली.या प्रकरणी  दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारूर तालुक्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. दिरानेच आपल्या विधवा वहिनीचा विनयभंग केला आहे. वहिनी “तू खूप चांगली दिसते, मला आवडतेस” असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित विधवा महिला गावातील शेतवस्तीवर आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत राहते. ती आंघोळ करीत असताना तिचा सख्खा दीर बाथरूममध्ये घुसला व तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करू लागला. यादरम्यान “तू मला खूप आवडतेस, म्हणत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. यावर नकार देताच त्याने तिला धमकीही दिली.

यावेळी दिराच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वत:ची सुटका केली आणि आरडओरडा केला. यामुळे शेजारील लोक जमा झाले. लोकांचा आवाज ऐकून आरोपी दिराने तेथून पळ काढला. या संतापजनक घटनेमुळे गावात खळबळ उडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version