Home महाराष्ट्र पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, खासगी बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, खासगी बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

0

मुंबई |

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. लोणावळ्याजवळील बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

यावेळी या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून, आणखी प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी होते. यामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टिम आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील प्रवासी असून पुण्याचा कार्यक्रम संपवून ते गोरेगाव येथे जात असताना हा अपघात घडला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version