Home नोकरी विषयक पोलिस भरतीत एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका

पोलिस भरतीत एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका

0

मुंबई |

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या उमेदवारांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर पोलिस महासंचालकांनी राज्यातील भरती झालेल्या सर्व जिल्ह्यांमधील पोलिस अधीक्षकांना त्याबाबतचे आदेश बजावले आहेत.त्यामुळे २०१९ मध्ये अशाप्रकारे निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारीच आता रद्द होणार आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई चालक या पदाकरिता एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज दाखल केल्याप्रकरणी अनेक उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे. याचा फटका सरसकट सर्वच उमेदवारांना बसला होता. ज्या उमेदवारांनी एकच अर्ज दाखल केला होता, अशा उमेदवारांची देखील सेवा समाप्त करण्यात आली होती. या बाधित उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठात दाद मागितली होती.

त्यानुसार दि. ११ एप्रिल २०२२ चा निर्णय रद्दबातल करण्यात आला. सन २०१९ मध्ये शिपाई, चालक पदाकरिता ३० नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेली जाहिरात ग्राह्य धरण्यात आली. तसेच ज्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक गटात आवेदन अर्ज केले अशा उमेदवारांची निवडदेखील झाली होती. त्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांनी आदेश जारी केले आहेत.

सन २०१९ मध्ये पोलिस शिपाई, चालक भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्याप्रकरणी ६ मे २०२२ व २२ जुलै २०२२ अन्वये निर्गमित करण्यात आलेली पत्रे रद्द करण्यात येत असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यांनी या आदेशात पुढे नमूद केले आहे कि, १७ मार्च २०२३ च्या न्या. ” निर्णयानुसार सन २०१९ मध्ये पोलिस, शिपाई चालक भरतीकरिता ३० नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रसारित केलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रकरणे ज्या उमेदवारांनी एकच अर्ज दाखल केला मात्र ज्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला अशा उमेदवारांची यादी नव्याने प्रसारित करावी. तसेच ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याकरिता त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी व त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, असे आदेश रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version