पुणे |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा वर्णनात्मक आणि वैकल्पीक अशी वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणार्या तज्ज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत. जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर बारावी परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
