Home क्राईम महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना १३ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना १३ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0

माजलगाव | 

जुने मीटर बदलून नवीन मिटर बसवले बाबतचे सांगून जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १३ हजार रूपये घेताच बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात केली.

एसीबीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करून शॉक दिल्याने खळबळ उडाली आहे. रामा बन्सीधर लोखंडे (वय ३८ वर्ष, कनिष्ठ लिपिक, म.रा.वि.वि. कंपनी. उपविभाग माजलगाव) व ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ (वय ३० वर्षे,कनिष्ठ सहाय्यक, माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version