16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

गौतमीच्या तीन गाण्याला तीन लाख,आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार; इंदुरीकरांनी घेतला समाचार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी |

गौतमी पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव आहे. अश्लील इशारे आणि डान्समुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. तिच्या डान्सला विरोध झाला, अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाले आणि शेवटी गौतमीला माफी मागावी लागली होती.

या सगळ्या गोष्टी घडून काही महिने झालेत, पण तरीही गौतमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतेच. आता कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. तिच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होते. याच सर्व मुद्द्यांवरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे.

आष्टी तालुक्यातील तवलवाडी इथे एका महोत्सवात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी नाव न घेता गौतमी पाटीलला टोला लगावला.

“आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही,” असं इंदुरीकर महाराज या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, काही गेल्या महिन्यात गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडणाऱ्या गौतमीवर आता इंदुरीकर महाराजांनीही अप्रत्यक्ष टीका केली आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles