- Advertisement -
बीड |
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज परळी वै तालुक्यातील मौ सेलू (स), पिंपळगाव (गाढे) शिवारातील काल झालेल्या गारपीट नुकसान ग्रस्त पिकांची पहाणी केली. ज्वारी,कांदा,मिर्ची,काकडी,व ईतर फळपिके व भाजीपाला या पिकांची पहाणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका कृषी अधिकारी श्री सोनवणे ,नायब तहसीलदार बी. एल रुपनर , सरपंच सेलू( स ) नवनाथ गर्जे , तसेच मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी हजर होते.
याप्रसंगी त्यांनी उपस्थित शेतकरी व अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रशासन अतिवृष्टी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कार्यवाही करत असल्याचा दिलासा दिला.