8.6 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img

लिफ्ट देण्याचा बहाणा करून लुटणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई |

छत्रपती संभाजी नगर येथील मार्केटींगसाठी अंबाजोगाईत आलेल्या नरेश शामराव रायकर यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिघांनी लुटले. ही घटना १४ मार्च रोजी अंबाजोगाई शहरात घडली होती. याप्रकरणी २० मार्च रोजी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रवाशाकडून तब्बल ५९ हजार रूपये लुटले होते. आता हे लुटणारे तिघेही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना अंबाजोगाई शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. प्रीतम विश्वनाथ खंदारे (वय २९ रा.नेहरूनगर, परभणी), आदित्य अशोकराव देशमुख (वय ३२ रा.खडकपुरा अंबाजोगाई) व अक्षय उर्फ राया सुधाकर धारेकर (वय २४ रा.माळेगाव ता.केज) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, सलीम शेख, विकी सुरवसे, अशोक कदम आदींनी केली.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles